बेळगाव / प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपचा की ५० जागा जिंकण्याइतपतही ताकद नसलेल्या काँग्रेस खासदार हवा याचा सुजाण मतदारांनी विचार करण्याची गरज असल्याचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर म्हणाले. बेळगाव दक्षिण मतदार संघात ब्राह्मण समाज ट्रस्टने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींसारखे कणखर नेतृत्व एका बाजूला आहे, तर काँग्रेसचे दुबळे नेतृत्व दुसऱ्या बाजूला आहे. या निवडणुकीत भाजप चारशेहून अधिक जागा जिंकेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे. यावेळी सर्वांनी भाजपला मतदान करून मला आशीर्वाद द्यावेत अशी विनंती केली.
याप्रसंगी आमदार अभय पाटील म्हणाले, ज्या ब्राह्मण समाजाने जनसंघ बांधला आणि जोपासला, त्यांनी नेहमीच भाजपला हिंदुत्वासाठी साथ दिली आहे.
निवडणुकीच्या काळात ब्राह्मण समाजाची सभा घेण्याची गरज नाही. कारण भाजप म्हणजे ब्राह्मण समाज असल्याचे त्यांनी सांगितले. येथे केवळ स्वत:लाच नव्हे तर इतरांनाही भाजपला मतदान करायला लावण्याची जबाबदारी असे त्यांनी सांगितले.
0 Comments