बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विस्तारित कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज शनिवार दि. 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित केली आहे. मराठा मंदिर हॉल रेल्वे ओव्हर ब्रिज येथे होणाऱ्या या बैठकीत विस्तारित कार्यकारिणीच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनपर बाबींवर चर्चा केली जाणार आहे. तेव्हा कार्यकारणीच्या सदस्यांनी याची नोंद घेऊन बैठकीला वेळेवर हजर रहावे, असे आवाहन रणजीत चव्हाण -पाटील व रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.
0 Comments