• शेतकऱ्याचे मोठे नुकसान

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याच्या खुशीत‌ वसलेल्या देगांव येथे वाघाच्या हल्ल्यात रेडा व म्हैस ठार झाली असल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देगांव येथील शेतकरी पुंडलिक गावडा यांच्या, म्हैस व रेड्यावर वाघाने हल्ला केल्याने रेडा जागीच ठार झाला. तर या हल्यात जखमी झालेली म्हैस थोड्या वेळाने, काल रात्री तिचाही मृत्यू झाला. सदर म्हैस आत्ताच वीस दिवसापूर्वी व्यायली असून तीला एक लहान वासरू आहे. रेडा व म्हैस मरण पावल्यांने सदर शेतकऱ्याचे जवळजवळ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते.
याबाबतची माहिती मिळताच, या विभागाचे वन अधिकारी (आरएफओ) महेश मरेन्नावर ‌ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतल्याचे समजते, शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने, वन खात्याने सदर शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई मिळवून देण्याची विनंती, या भागातील शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत.