बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसांपासून रिक्त असलेल्या बेळगाव पोलीस आयुक्तपदी लाडा मार्टिन मरबनियांग यांची नियुक्ती झाली आहे. २००९ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी लाडा मार्टिन मारबनियांग हे बेळगावची धुरा सांभाळणार आहेत. पोलीस भरती विभागाचे डीआयजी असलेले मार्टिन बेळगाव पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावणार आहेत.
गेल्या महिन्यात डॉ. सिद्धरामप्पा हे सेवानिवृत्त झाल्यानंतर बेळगाव पोलीस आयुक्त पद रिक्त झाले होते. त्या पदावर लाडा मार्टिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे मेघालयचे असणारे मार्टिन यांनी २००९ साली आयपीएस अधिकारी बनल्यानंतर गुलबर्गा, यादगिर जिल्ह्याचे एसपी आणि सीआयडी बेंगळूर येथे सेवा बजावली आहे. ४४ वर्षीय या तरुण आयपीएस अधिकाऱ्याने आर्ट्स मध्ये मास्टर डिग्री केली आहे.
0 Comments