बेळगाव / प्रतिनिधी 

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर आज  बुधवार (दि. २७ मार्च ) रोजी सकाळी १० वा. हिरेबागेवाडी टोल नाका मार्गे बेळगांव लोकसभा मतदार संघात येणार आहेत. यावेळी  हजारो भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी ठीक १० वा. जगदीश शेट्टर हिरेबागेवाडी टोलनाकामार्गे बेळगावात दाखल होऊन, स. १०.३० वा. किल्ला दुर्गादेवी मंदिरामध्ये पूजा करणार आहेत. पूजन कार्यक्रमानंतर तिथूनचं हजारोंच्या संख्येने बाईक रॅलीला सुरुवात होईल.   

रॅलीचा पुढील मार्ग खाली दिल्याप्रमाणे असेल... 

कोर्ट आवारातील क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या मूर्तीला मालार्पण करून पुढे राणी चन्नमा यांच्या मूर्तीला मालार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला मालार्पण करून,राणी चन्नमा सर्कल मधील गणपती मंदिरमध्ये आरती होईल. आरती झाल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, कपिलेश्वर मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण होईल. नंतर महात्मा फुले रोडवरून गोवावेस मधील जगत ज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीला मालार्पण करून, सदाशिवनगर मधील भाजप  महानगरच्या कार्यालयाजवळ या बाईक रॅलीची सांगता होईल, असे कळविण्यात आले आहे.