बेळगाव : येथील बाग परिवाराच्यावतीने नुकताच मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम जेष्ठ कवी निळूभाऊ नार्वेकर यांच्या निवासस्थानी करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ कवी बसवंत शहापूरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पुढारी शाखेचे निवासी संपादक, पत्रकार गोपाळ गावडा आणि कवी पत्रकार शिवाजीराव शिंदे उपस्थित होते.
कवयित्री स्मिता पाटील यांनी ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यांनंतर बाग परिवाराचे समुह प्रमुख कवी भरत गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थित मान्यवरांचे शाल, पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रारंभी कवयित्री डॉ. मेघा भंडारी यांनी माय मराठी ही कविता सादर करून वातावरण मराठीमय केले.तदनंतर अस्मिता अळतेकर यांनी महत्व,अपर्णा पाटील यांनी मराठी भाषा,दत्ता घोडके यांनी मिलन, अशोक सुतार यांनी गौरवशाली मराठी, रोशनी हुंद्रे यांनी बोलतो भिडेवाडा,मधू पाटील यांनी मायबोली मराठी, चंद्रशेखर गायकवाड यांनी स्मार्ट सिटी, अंजली देशपांडे यांनी लेखणी, अक्षता यळ्ळूरकर यांनी बाप ओळखता येत नाही, मनीषा नाडगौडा यांनी तिचे अंतरंग,शुभदा खानोलकर यांनी निसर्ग, गुरुनाथ किरमटे यांनी स्वयंमी मन, आदी एकापेक्षा एक विषयाच्या आशयाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्मिता किल्लेकर यांनी केले.यावेळी किरण कूलकर्णी,शितल पाटील संदीप मुतगेकर उपस्थित होते.अस्मिता अळतेकर यांनी आभार मानले
0 Comments