• बेळगाव सीसीबी पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

अवैध मद्यविक्री आणि तस्करीवर कारवाई करून सीसीबी पोलिसांनी एकाला अटक केली. खबऱ्याकडून मिळालेल्या खात्रीलायक माहिती आधारे काल गुरूवार (दि. २८ मार्च) रोजी  सीसीबीचे पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्ष्मीनगर हिंडलगा, बेळगाव येथे छापा घालून ही कारवाई केली. राजेश केशव नायक (वय ४१ रा. हिंडलगा, बेळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून अंदाजे १८६.५ लि. मद्य (अंदाजे किंमत ९,०९,७५० रू.) आणि वाहतुकीसाठी वापरलेली १.५ लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली आहे. 

सदर कारवाईबद्दल बेळगाव पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कारवाईत सहभागी सीसीबी शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.