बैलहोंगल : विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने चारा वाहतूक करणाऱ्या ट्रकला लागलेल्या आगीत चारा जळून खाक झाला. तर ट्रकचेही मोठे नुकसान झाले. इंचल (ता. बैलहोंगल) येथे ही घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, ट्रक इंचल गावातून मेकळमर्डी क्रॉसच्या दिशेने निघाला होता. यावेळी विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने आग लागून ट्रकमधील चारा जळून खाक झाला, यावेळी लागलेली आग एवढी भीषण होती की, रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड ज्वाळा पेटल्या होत्या. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले, यामुळे पुढील अनर्थ टळला.
0 Comments