- रायबाग तालुक्यातील मुगळखोडानजीक जत-जांबोटी राज्य महामार्गावरील घटना
रायबाग : बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील मुगळखोडा जवळ जत-जांबोटी राज्य महामार्गावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी दि. 23 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मुडलगी तालुक्यातील गुर्लापूर येथून हारुगेरी शहराकडे जाणारी स्विफ्ट कार, होंडा शाईन बाईक आणि एक्सेल सुपर बाईक यांच्यात भीषण अपघात झाला. शिफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुचाकींना धडकून झाडावर आदळली. त्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
गुर्लापूर गावातील लक्ष्मी रामाप्पा मराठे (१९), मल्लिकार्जुन रामाप्पा मराठे (१६). आकाशा रामाप्पा मराठे (१४). शिफ्ट कार चालक एकनाथ भीमप्पा पडथरे (२२). नागप्पा लक्ष्मण यादववरा (४८, रा. मुंगळगाव) अशी मृतांची नावे आहेत. एक्सेल सुपर बाईक चालक आणि गोकाक तालुक्यातील दुरदुंडी गावातील शिक्षक हणमंता मलप्पा. बालानंद परसप्पा मालगी (३७) असे मल्यागोळ (४२) यांचे नाव आहे.
गोकाक शहरातील रहिवासी असलेले होंडा शाईन दुचाकीस्वार बालानंद परप्पा यांच्यावर मालगे हारुगेरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे...
बेळगावचे अतिरिक्त एसपी रामगोंडा बसरगी, अथणीचे डीवायएसपी श्रीपदा जालदे, हारुगेरी सीपीआय रविचंद्रन बडापाकिरप्पानवर, अथणी सीपीआय रवींद्र नायकवडी, हारुगेरी पीएसआय गिरिमल्लाप्पा उप्पार, एएसआय एसएल बडाकार, अशोक शेंडगे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि हरुगेरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुन्हा दाखल केला.
0 Comments