विद्यार्थ्यांना भेटवस्तू देताना मान्यवर 

हिंडलगा दि. २० फेब्रुवारी २०२४

मण्णूर येथील एम.डी.चौगुले शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने बेळगांव तालुक्यातील एसएसएलसी विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता रविवार दि. १९ कलमेश्वर हायस्कूल येथे झाली. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व म. ए. समितीचे युवानेते आर.एम.चौगुले अध्यक्षस्थानी उपस्थित होते. व्याख्यात्या म्हणून द.म.शिक्षण मंडळाच्या ज्योति सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या मायादेवी अगसगेकर व टिळकवाडी हायस्कूलचे मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक सी.वाय.पाटील, कलमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय.के.नाईक उपस्थित होते.

प्रारंभी कलमेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक मनोगत निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश जी. बेळगुंदकर यांनी केले. सरस्वती प्रतिमा पूजन मायादेवी अगसगेकर व कै. एम. डी. चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन वाय. के. नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. दीपप्रज्जलन आर.एम.चौगुले, प्रिती आर. चौगुले, सी. एम. राक्षे, एन.के.कालकुंद्री यांच्याहस्ते करण्यात आले. 

यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत प्रतिष्ठानचे डी. एम चौगुले, एस. एम. चौगुले यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. व्याख्यानमालेसाठी नियुक्त केलेले विषय तज्ञ शिक्षक टिळकवाडी हायस्कूलचे कन्नडसाठी संजीव कोष्टी, मराठीसाठी सी. वाय. पाटील, विज्ञानसाठी सुरेश भातकांडे, इंग्रजीसाठी सुनिल लाड (विद्यानिकेत शाळा), गणितसाठी पी. आर. पाटील (शिवराज हायस्कुल बेनकनहळ्ळी) , समाजविज्ञान रणजीत चौगुले (सरदार हायस्कूल) यांनी उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. 

या शैक्षणिक कार्याची प्रशंसा व्याख्यात्या मायादेवी अगसगेकर यांनी केली व विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून साध्य करण्यासाठी कष्ट करावेत - ग्रामीण भागातील विद्यार्थी  हे साध्य करू शकतात असा विश्वास दिला. उपस्थित तज्ञ शिक्षकांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.एम.चौगुले व प्रिती आर.चौगुले यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.  तर मण्णूर पंचक्रोशीतील विविध हायस्कूल मध्ये उपस्थित असलेल्या दोनशे विद्यार्थ्यांना फाईल स्वरूपात वस्तू देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मनोगतानंतर आभार भरमा चौगुले यांनी मानले. 

या कार्यक्रमाला विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक प्रत्येक रविवारी उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे यंदा ७ वे वर्ष असून यामधील काही गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. बेळगावच्या पश्चिम भागात या स्तुत्य उपक्रमाबद्दल पालक वर्ग कौतुक करीत आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलमेश्वर हायस्कूलचे शिक्षकवृंद, जोतिबा चौगुले, महेश एस.चौगुले यांनी परिश्रम घेतले.