विजयपूर / वार्ताहर
चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेल टँकर उलटला. विजयपूर शहरातील बसवेश्वर सर्कल येथे सोमवारी पहाटे विजयपूर वाहतूक पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने टँकर बाजूच्या भिंतीला धडकून पलटी झाला.
या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. सुदैवाने डिझेल टँकरमध्ये डिझेल नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. विजयपूर शहरातील बसवेश्वर चौकाजवळ टँकर वाहन उलटल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, क्रेनच्या साहाय्याने उलटलेला टँकर हटवून वाहतूक सुरळीत केली.
0 Comments