•   २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ४ दिवस प्रदर्शन

बेळगाव : यश इव्हेंटस् व बेळगाव कॉस्मो राऊंड टेबल ३७० आयोजित व व्हेगा हेल्मेट, कॅनरा बँक पुरस्क‌त आॕटो एक्स्पो सीपीएड मैदानावर दि. २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान ४ दिवस आयोजित करण्यात आला आहे, यामध्ये २२० स्टाॅलची मांडणी करण्यात आली आहे. ऑटो एक्स्पो मधील चार चाकी विभागात सुंदरम, मर्सिडीज, बेंगळूरु सेंट्रल ऑडी, वर्षा ऑटो कार बीएमडब्लू, सुतारीया महिंद्रा, कुमार मोटर्स सिट्राॅन व वोल्कस वॅगन, माणिकबाग टाटा, शोधा टोयोटा, बीवायडी इलेक्ट्रिक यांचा सहभाग राहणार आहे.

ऑटो एक्स्पोमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एडीएमएस, बीएम मोटर्स क्वांटम, बीगॉस, यश ऑटो अॕंपीएर, ओकाया, रवी मोटर्स हिरो, निओ नाईस, हाय टेक टीव्हीएस या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक विविध प्रकारची दुचाकी वाहने तर गिअर हेड सायकल प्रदर्शित होणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक मोटर सायकलही या प्रदर्शनाचे खास आकर्षण राहणार आहे. तसेच प्रदर्शनात तात्काळ बुकींगवर खास आकर्षक सूट देण्यात येणार आहे.

ऑटो एक्स्पो मधील दुचाकी विभागात जगजंपी बजाज, अरिहंत सुझुकी, हायटेक टीव्हीएस,सॅव्हसाॕन यामाहा, कॉसमिक व्हेस्पाचा सहभाग राहणार आहे. ॲक्सेसरीज विभागात एस पी ऑटो  एम टेक गार्ड, ऑटो गॅलरी, मिलन ऑटो सेंटर, बीपीसीएल व मोटूल आॕईल, सुरेश ऑटो सेंटर, एअर विंग्ज इंटरनॅशनलतर्फे विविध प्रकारच्या सुट्या पार्टची मांडणी केली जाणार आहे. 

प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ड्रायव्हिंगचे मार्गदर्शनासाठी भारत मोटर ड्रायव्हिंग स्कूल मार्गदर्शन करणार असून गोव्यातील पर्यटनाची माहिती हार्प बेवाॕच रिसाॕर्ट देणार आहे.

ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल सोल्युशन्स, डिझाईन, टिकाव आणि तंत्रज्ञानातील अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सचे अनावरण आणि श्रेणी पाहण्यास मिळणार असून ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या उत्क्रांतीचे प्रदर्शन करून इलेक्ट्रिक वाहनांपासून ते लक्झरी कारपर्यंत अत्याधुनिक ऑटोमोबाईल्सच्या प्रदर्शनात स्वतःला मग्न करा. प्रदर्शनातील संजय घोडावत यांची लक्झरी वाहने आणि स्पोर्ट्स बाईक हे या एक्स्पोचे मुख्य आकर्षण आहे आणि बाईक स्टंट शो आयोजित केला जाणार आहे.अशी माहिती यश इव्हेंटचे अजिंक्य कालकुंद्रीकर, प्रकाश कालकुंद्रीकर व विनय कदम यांनी दिली.