• सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांचा पुढाकार  

  • स्वखर्चातून पिण्याच्या पाण्यासाठी कुपनलिकेची सोय  

बेळगाव : गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यावर्षी सर्वांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करण्याची वेळ आली आहे. अशावेळी बांधकाम व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी स्वखर्चातून चार गावांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर देसूर आणि यरमाळ गावासाठी स्वखर्चातून कुपनलिका खोदून दिलेल्या आहेत. आज शनिवारी यरमाळ येथे कुपनलिका खुदाई कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

याप्रसंगी गोविंद टक्केकर यांनी मशीनचे पूजन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आहे. पुढील काही दिवसात पाण्याची टंचाईची समस्या आणखी तीव्र होणार आहे. याची दखल घेऊन देसूर आणि यरमाळ गावासाठी कूपनलिकैची खुदाई केली जात आहे.नवीन कुपनलिकांमुळे या दोन गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. पुढील काही दिवसातही अन्य गावात मी स्वखर्चाने कुपनलिका खोदून देणार आहे.या कामात  गावकऱ्यांचे   मोलाचे सहकार्य असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तर टक्केकर यांनी गावात कुपनलिका खोदल्याबद्दल गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या निकिता सुतार, महादेव दळवी, निलेश सुतार,मारुती पाटील, दशरथ पाटील,भरमन्ना पाटील, अजित लोहार, ज्योतिबा पाटील, कृष्णा नाईक, निलेश पाटील, पांडुरंग तुपटकर, शाहू नाईक,कृष्णा सावंत,किरण हुंदरे,पूजा शहापूरकर, बसवंत नाईक व अन्य गावकरी उपस्थित होते.