चिक्कोडी : डोक्यात दगड घालून युवकाचा खून केल्याची घटना तालुक्यातील हातरावट गावात उघडकीस आली आहे. निंगाप्पा बुलारे (27) खून झालेला युवक निंगाप्पा बुलारे हा गवंडी होता. तो हातरवाट येथे टाकी बांधण्यासाठी आला होता.
रात्री काम आटोपल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत इतर गवंडी कामगारांशी बाचाबाची झाली. यावेळी इतर गवंडी मित्रांनी निंगाप्पाचा खून करून पळून गेले. चिक्कोडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
चिक्कोडी डीवायएसपी गोपालकृष्ण गौडर, सीपीआय नागेश कडदेवरा, पीएसआय सचिन कुमार दसरेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. चिक्कोडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments