• दुकानातील (स्क्रॅब गोदामातील) साहित्य जळून खाक
  • ढोर गल्ली वडगाव येथील घटना

बेळगाव :  वडगाव ढोर गल्ली येथे आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एका गुजरी दुकानाला (स्क्रॅब गोदामाला) आग लावली. या घटनेत दुकानातील (स्क्रॅब गोदामातील) टिन, लोखंड, भंगार, कागद, वाहनांचे सुटे भाग आदि साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. 

अग्निशमन दलाचे जवान गेल्या दोन तासांपासून आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अजूनही आग आटोक्यात आलेली नाही.