- टिळकवाडी पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावातील मंडोळी रोडवरील एका अपार्टमेंटमधून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून पळून जाणाऱ्या आरोपीला अटक करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. राजू उप्पलापती (रा. मूळचा आंध्रप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ७७ ग्रॅम सोने आणि ५५० ग्रॅम चांदी असे ४२ लाखांचे दागिने आणि डीएसएलआर कॅमेराही जप्त करण्यात आला आहे.आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
याप्रकरणी टिळकवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments