- बेळगावात ट्रक चालक - मालकांची निदर्शने
- जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
भारतीय दंड संहिता २०२३ नुसार केंद्र सरकारने नुकताच जारी केलेला, हिट अँड रन हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हा ट्रक चालक-मालक संघटनेने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनांसह तीव्र आंदोलन केले.
हिट अँड रन प्रकरणात चालकांना ७ लाखांचा दंड आणि १० वर्षांची शिक्षा ठोठावण्याची तरतूद केली आहे. तेव्हा वाहन चालकांसाठी अन्यायकारक असणारा हा कायदा शासनाने त्वरित रद्द करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी चालक संघटनेचे सदस्य बसवराज तडकोड म्हणाले, वाहन चालकांकडे ७ लाख रुपये असतील तर कोणीही वाहन चालवण्याचा व्यवसायात येणार नाही, तेव्हा हा कायदा केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी मंगेश गुरव यांनी, केंद्र सरकारने वाहन चालकांना त्रासदायक ठरणार हा कायदा तात्काळ मागे घ्यावा, ७ लाखांचा दंड आणि दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा हा कायदा अनाठायी असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नोमान खानापुरे यांच्यासह बेळगाव ट्रक चालक-मालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
0 Comments