- १ कोटी ४० लाख रुपये किंमतीचा बेकायदा मद्यसाठा जप्त
खानापूर / प्रतिनिधी
अबकारी खाते खानापूर यांच्यावतीने मार्च २०२३ ते जानेवारी २०२४ आजपर्यंत वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरटी वाहतूक करताना पकडून जप्त केलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा नष्ट करण्यात आला.
होणकल (ता. खानापूर) येथील एका शेतवडीत सदर मद्यसाठा नष्ट करण्यात आला आहे.नष्ट केलेल्या मद्यसाठ्याची एकूण किंमत १ कोटी ४० लाख रूपये इतकी होते, अशी माहिती अबकारी खात्याच्या बेळगाव जिल्हा दक्षिण विभाग उत्पादन शुल्क आयुक्त वंजाक्षी एम यांनी दिली. याप्रसंगी माहिती देताना त्या म्हणाल्या की, यावर्षी खानापूर तालुक्यात एकूण ७२ गुन्ह्यात उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने पकडलेला १०३३३ लिटर मद्यसाठा, तसेच 135 लिटर बिअर साठा नष्ट करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी रवी मुरगोड अबकारी उपविभाग उपायुक्त बेळगाव, प्रणेश कागवाड ksbcl व्यवस्थापक बेळगाव, व मल्लेश उप्पार, रवी होसल्ली निरीक्षक खानापूर, मल्लू निलजकर उपनिरीक्षक खानापूर हे उपस्थित होते.
0 Comments