बेळगाव / प्रतिनिधी 

सेंट पॉल्स हायस्कूलचा विध्यार्थी अमन अभिजीत सुनगार याची २७ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत चेन्नई येथे होणाऱ्या 'खेलो इंडिया' युथ गेम्समध्ये  जलतरण खेळासाठी निवड झाली आहे. अमन हा त्याचे प्रशिक्षक उमेश कलघटगी आणि अक्षय शेरेगार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जलतरण क्लब येथे प्रशिक्षण घेत आहे. बेंगळुरच्या डॉल्फिन क्लबचे प्रशिक्षक मधुकुमार एम. बी. , शाळेचे मुख्याध्यापक फादर सेबी, शिक्षक आणि वडील अभिजीत सुनगार यांचे त्याला प्रोत्साहन लाभत आहे..