सुळगा (हिं.) / वार्ताहर

अयोध्या येथील राम मंदिरात सोमवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झालेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सुळगा (हिं.) वेंगुर्ला रोडवरील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघ लि. च्या मुख्य कार्यालयात श्रीराम प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला. संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. अशोक यल्लाप्पा पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


प्रारंभी श्री. निंगाप्पा देसुरकर, श्री. अशोक यल्लाप्पा पाटील, श्री. बी. एन. बेनके, श्री. एल.बी. खांडेकर, श्री. यल्लाप्पा भरमा पाटील, श्री. शिवाजी गावडू पाटील, श्री. टोपाण्णा परशराम पाटील, श्री. मारुती आ. पाटील, श्री. भरमा शट्टू कणबरकर आदि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. अशोक यल्लाप्पा पाटील यांनी अयोध्या येथे बांधण्यात आलेले श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याबद्दल विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. यावेळी मुख्यव्यवस्थापक श्री. एन. वाय. चौगुले, सौ. ज्योती चौगुले, श्रीमती. रेखा तुप्पट, श्री. राकेश खांडेकर, श्री. यल्लाप्पा बाळेकुंद्री, कु. मानसी इराप्पा खांडेकर, सौ. पूजा विलास सावंत, श्री. लुमाण्णा शट्टू पाटील, हभप. श्री. राजू म. कदम व श्री. यल्लाप्पा रवळू कदम यांच्यासह संस्थेचे संचालक, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.