गोकाक / वार्ताहर 

भरधाव दुचाकीची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी स्वारासह अन्य एकजण जागीच ठार झाला. गोकाक शहरातील लोळसूर पुलाजवळ ही घटना घडली. दूंडाप्पा हादगीन (वय ४५, रा. शिवापूर ता. मुडलगी) आणि सत्येप्पा रामाप्पा चिंचली अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, गोकाक शहरातील लोळसूर पुलानजीक बागेवाडी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने गोकाक येथील पटगुंदी हनुमान मंदिरापासून मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, भरधाव वेगात मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी वळण घेत असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद गोकाक शहर पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.