बेळगाव / प्रतिनिधी
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे पालखीच्या पादुका दर्शन सोहळ्याला दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सोलापूर येथून प्रारंभ झाला आहे. सोहळ्याचे यंदाचे २७ वे वर्ष असून दि. १२ जानेवारी २०२४ रोजी ही पालखी कोवाडहून बेळगावात दाखल होत आहे. सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात ही पालखी परिक्रमा करीत आहे.
या पालखीचा बेळगाव येथील कार्यक्रम पुढील प्रमाणे : शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी पालखीचे सायंकाळी ४ वा. हट्टीहोळी गल्ली, शहापूर येथे आगमन त्यानंतर मिरवणूक, महाप्रसाद व मुक्काम १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री गाडगेबाबा भवन येथे आरती व महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी ४ वाजता श्री स्वामी समर्थ आराधना केंद्र, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स ,महाद्वार रोड बेळगाव येथे पालखीचे आगमन. त्यानंतर मिरवणूक आणि रात्री महाप्रसाद व मुक्काम होईल. दि. १४ जानेवारी रोजी पहाटे अभिषेक झाल्यानंतर पालखी आझाद सोसायटी हनुमान नगर येथे जाईल. तेथे दुपारची आरती व महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी प्रमोद बर्डे, गुड्स शेड रोड बेळगाव येथे मुक्काम आणि महाप्रसाद. दि. १५ जानेवारी रोजी सकाळी गोकाकला प्रयाण, त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता विकास बर्डे नक्षत्र कॉलनी ,गणेशपुर येथे आगमन, मुक्काम आणि महाप्रसाद. १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दीपक खोबरे, ओमनगर येथे आगमन व महाप्रसाद. त्याच दिवशी सायंकाळी पिरनवाडी येथे पालखी जाणार असून तेथे मुक्काम व महाप्रसाद होईल. तर १७ जानेवारी रोजी राजेंद्र गायकवाड, कडोलकर गल्ली,बेळगाव येथे मुक्काम व महाप्रसाद होणार आहे. यावर्षी नवीन काही जागा वाढवण्यात आल्या आहेत. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन या सर्व आयोजकांनी केले आहे.
0 Comments