सुळगा (हिं.) / वार्ताहर 

अयोध्या येथे होणाऱ्या भगवान श्री राम मंदिर उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आज बेळगाव ग्रामीण मधील सुळगा (हिं.) येथील हनुमान मंदिरात  विविध संघटनांच्या माध्यमातून महाआरती आयोजन करण्यात आले होते.

या महाआरतीला बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील, भाजपा ग्रामीण माजी अध्यक्ष विनय विलास कदम, क्षत्रिय मराठा संघटन बेळगाव अध्यक्ष संजय पाटील, श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान बेळगाव अध्यक्ष परशुराम राजाराम तूप्पट, भाजप नेते राजू पोटे, मल्लाप्पा पाटील, डॉ. उमेश शिंदोळकर, उमा शंकर देसाई, गणपतराव देसाई, सुरेश सावंत, डॉ. राजू गवीमठ, आर.आर. चौगुले, अरुण सांबरेकर, यल्लाप्पा कलबंट यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी  माजी आमदार संजय पाटील यांच्याहस्ते महाआरती व प्रसाद वितरण करण्यात आला.


याप्रसंगी बोलताना त्यांनी सर्व हिंदू बांधवांना अयोध्या येथे होणाऱ्या भगवान श्रीराम मंदिर उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त शुभेच्छा दिल्या. 

तसेच आज आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या महाआरतीला व शेकडो रामभक्त कार्यकर्ते माता भगिनी उपस्थित होत्या.