- विजयपुर शहरानजीक अलीयाबाद औद्योगिक क्षेत्रातील घटना
विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपुर शहराजनजीक अलीयाबाद येथील औद्योगिक क्षेत्रातील एका गोदामात मक्क्याने भरलेली पोती कोसळलेल्या दुर्घटनेत सात कामगार मृत्यूमुखी पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, ही घटना राजगुरू इंडस्ट्रीजच्या गोदामातील फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये घडली असून काही कामगार जखमी झाले आहेत. गोदामात साठवलेल्या मक्याच्या पोत्यांवर मोठे यंत्र पडले. त्यामुळे पोती कोसळल्याने तिथे काम करणारे बिहारचे मजूर त्याखाली अडकले होते. या दुर्घटनेत सात कामगार मृत्यूमुखी पडले, त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर सर्व मृतदेह विमानाने बिहार राज्यातील त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्या दुर्देवी कामगारांच्या परिवाराला राज्य सरकारच्यावतीने प्रत्येकी सात लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून या मक्का प्रक्रिया प्रकल्पात विविध ठिकाणचे कामगार काम करत आहेत. काल सायंकाळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेनंतर चार जेसीबीच्या सहाय्याने मका बाजूला करून कामगारांना वाचविण्याचे काम सुरू करण्यात आले ते आज मंगळवार रोजी दुपार पर्यंत पूर्ण झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एसपी ऋषिकेश भगवान सोनावन आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदत कार्य सुरुवात केली केली. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दलाचे जवानही बचावकार्यात गुंतले. दरम्यान, मक्क्याने भरलेली पोती कोसळलेल्या ठिकाणी तीन जण अडकल्याचा व्हिडिओ उपलब्ध झाला होता.
दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरूच असताना सहा कामगारांना वाचवण्यात आले आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती देणारे संरक्षित मजूर रंजमुतिया यांनी मक्याची भरलेली पोती कोसळल्याची घटनाची माहिती देताना सांगितले प्रोसेसिंग युनिटमध्ये कामगार काम करत असताना अचानक अपघात झाला. पोत्याचा आणि मक्याचा ढीग माझ्या अंगावर पडला. मला काय करावं कळत नव्हतं. मका त्याच्या मानेपर्यंत होता. त्याला हातपाय हलवता येत नव्हते आणि बाहेरही येता येते नव्हते. अखेर बाहेर थांबलेल्या कामगारांनी हात धरून मला उचलले आणि मला जीवदान दिले. माझ्या पायाला आणि कंबरेला दुखापत झाली आहे. देवाने मला वाचवले, असे अश्रूंनयनाने सांगून त्याने सांगितला.
कृष्ण किसनकुमार वय 26, राजेशकुमार मुकिया वय 26 , संबु मुकिया वय 43, लुको यादव वय 42, रामब्रीद्र मुकिया वय 45, रामबालाक मुकिया वय 43 दुल्हारा चंद मुकिया वय 58, अशी मृतांची तर सोनू करमचंद, रविंशकुमार, अनिल, कळमेश्वर मुकिया, किशोर हंजरीमल जैन, प्रकाश भडकल जखमींची नावे आहेत.
- जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांची घटनास्थळी धाव :
विजयपुर शहराच्या सीमेवर असलेल्या अलियाबाद येथील औद्योगिक क्षेत्रातील राजगुरू इंडस्ट्रीजच्या मक्का प्रक्रिया प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना सात लाख रुपये भरपाई देण्यात येईल, असे उच्च व मध्यम उद्योग मंत्री पायाभूत सुविधा विकास व जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.
सोमवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेची माहिती समजताच बेळगाव विधिमंडळाच्या अधिवेशनात असलेल्या मंत्र्यांनी रात्री उशिरा विजयपुर शहरात धाव घेतली. तसेच, त्यांनी घटनास्थळी जाऊन मध्यरात्रीपर्यंत बचाव कार्याची पाहणी केली. जिल्हाधिकारी टी. भुबलन, जिल्हा पोलिसप्रमुख ऋषिकेश सोनावन, जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल शिंदे यांनी ही घटना आणि त्यानंतर करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहिती घेतली
यावेळी उपस्थित असलेल्या उर्वरित कामगारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. मक्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व मजुरांचे मृतदेह बाहेर काढले जातील आणि शवविच्छेदनानंतर त्यांच्या मूळ राज्य बिहारला पाठवले जातील. याबाबत कोणीही काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगून त्यांना नैतिक धैर्य दिले.
याशिवाय राजगुरू इंडस्ट्रीजच्या मालकांकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा पालकमंत्री या नात्याने कामगारांना शासनाकडून सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या घटनेने अतिशय दु:ख झाल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. घटनेची माहिती मिळताच मी बेळगाव अधिवेशनातून थेट येथे आलो.घटना घडल्यापासून मी जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलिसप्रमुख यांच्याशी सतत संपर्कात आहे. बचाव कार्याबाबत सातत्याने माहिती घेतली आहे. या घटनेत मृतांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्यात येणार आहेत. त्यांनी बिहारच्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि सांगितले की, कामगारांचे पार्थिव संबंधित गावांमध्ये पाठवण्याची सर्व व्यवस्था केली जाईल असे ते म्हणाले.
या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही याची चौकशी अधिकारी करणार आहेत. या घटनेत कोणाची चूक आहे याचा तपास केला जाईल. सर्व दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच माणुसकीच्या दृष्टीकोनातून मृत कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई बरोबरच राजगुरू इंडस्ट्रीजच्या मालकांनाही नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. जखमींनाही भरपाई दिली जाईल,असे एम. बी. पाटील यांनी सांगितले.
0 Comments