बैलहोंगल : दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार तर चारजण गंभीर जखमी झाले. बैलहोंगलनजीक इंचाळ गावाजवळ गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली.
मंगल महांतेश भरमनायकर (वय ५०, रा. लड्डीगट्ट, बैलहोंगल) व चालक श्रीशैल सिद्धनगौडा नागनगौडर (वय ४०, रा. संपगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर रायनायका भरमनायकर (वय ८७), गंगाव्वा रायनायक भरमनायकर (वय ८०), मंजुळा श्रीशैल नागनगौडर (वय ३०), चालक सुभानी लालसाब वकुंड (२८, रा. इंचल) यांना उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, बैलहोंगल येथील भरमनायकर यांचे कुटुंब १८ जानेवारी रोजी होणाऱ्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी कपडे खरेदी करण्यासाठी कोन्नूर गावात गेले होते. इंचाळ गावाजवळ समोरून येणारी कार इंचाळ येथून राज्य महामार्गाकडे जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे .
अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख वेणुगोपाल एम., पोलिस उपअधिक्षक रवी नाईक, मुरागोड पोलिस निरीक्षक इरय्या मठपती यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
0 Comments