• अहिंद वकील संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे कायमस्वरूपी फिरते खंडपीठ  आणि अतिरिक्त ग्राहक आयोगासाठी बेळगावात तातडीने इमारत उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी अहिंद वकील संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले. कर्नाटक राज्य ग्राहक निवारण आयोगाचे कायमस्वरूपी फिरते खंडपीठ स्थापन करण्याची शिफारस यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यानुसार तातडीने इमारतीची निवड करावी तसेच बेळगाव येथे कार्यरत अतिरिक्त ग्राहक आयोगासाठी स्वतंत्र न्यायालयाचे व्यवस्था करावी. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे समस्या निर्माण होणार आहेत. त्याकरिता  आतापासूनच उपाययोजना करावी अशी मागणी अहिंद वकील संघाचे पदाधिकारी एन. आर. लातूर यांनी केली.

कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी फिरत्या खंडपीठासाठी तातडीने इमारतीची निवड करण्यात यावी आणि अतिरिक्त ग्राहक आयोग कायमस्वरूपी करण्यात यावा आणि स्वतंत्र न्यायालय कक्ष, कर्मचारी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

या आंदोलनात निंगाप्पा मस्ती, चेतन हेगडे, विनोद एस. पाटील, के.के.यादगुडे, एस. बी. पडवेपणावर, व्ही. एस. पाटील सहभागी झाले होते.