बेळगाव / प्रतिनिधी 

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज विधानसभेतील उत्तर कर्नाटक विषयी चाललेल्या चर्चेत भाग घेतला. यावेळी तालुक्याच्या समस्या मांडताना आमदार हलगेकर यांनी मराठीतून बोलण्यास सुरुवात केली. मला कन्नड स्पष्ट  बोलता येत नसल्याने सभापतींनी मातृभाषेतून बोलण्याची परवानगी द्यावी अशी त्यांनी विनंती केली. यावेळी आमदार लक्ष्मण सवदी यांनी हलगेकर यांच्या मनोगतात खोडा टाकण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी विधानसभेचे सभापती यु. टी. खादर यांनी आमदार हलगेकर यांनी मराठीतून बोलावे. सदस्यांनी दुसऱ्या भाषेचा द्वेष करू नये, असे सांगून आमदार लक्ष्मण सवदी यांचे कान टोचले.

यावेळी आमदार हलवेकर यांनी आमच्या मतदारसंघात जाताना सर्वच नेते मराठीतून बोलतात. माझ्या मतदारसंघात ७५ टक्के मराठी भाषिक आहेत. ३१४  सरकारी शाळांपैकी २०६  शाळा मराठी आहेत. अशावेळी बहुसंख्य मराठी असलेल्या गावातील शाळेत कन्नड शिक्षकांच्या नेमणुका केल्या जातात. हुबळी धारवाडला आमच्या मतदारसंघातून पाणी जाते. मात्र खानापूरलाच हे पाणी मिळत नाही. याकडे देऊन खानापूरला पाणी द्यावे. यामध्ये राजकारण करू नये. कळसा भांडुरा ऐवजी काटगाळीनजीक डॅम बनवा. खानापूर तालुक्यातील एकूण ९०० किलोमीटर रस्त्यापैकी एकही रस्ता चांगला नाही. त्यांची त्वरित सुधारणा केली जावी अशी ही मागणी केली.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇