विजयपूर / वार्ताहर
ऊस तोडणी करताना सर्पदंश झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. विजयपूर जिल्ह्याच्या आलमेल तालुक्यातील मोरटगी गावात ही घटना घडली. ममता राजू कासाडे (वय २६ रा.जुन्नर महाराष्ट्र) असे मृत महिलेचे नाव आहे. ऊस तोडणी करताना या महिलेच्या डाव्या पायाला घोणस जातीच्या विषारी सर्पाने दंश केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सिंदगी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments