बेळगाव / प्रतिनिधी

येत्या ४ ते १५ डिसेंबर या कालावधीत बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याचे कर्नाटक विधानसभा सचिवांनी जाहीर केले आहे. शनिवार व रविवार तसेच सुट्टी वगळता दहा दिवस अधिवेशन चालणार आहे. 

अधिवेशनात सार्वजनिक हिताचे प्रश्न, सूचना या नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून परवानगी दिली जाते. विधानसभेच्या कार्यपद्धती आणि आचार नियमांनुसार, अधिवेशन कालावधीत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांसह एका दिवसात जास्तीत जास्त पाच प्रश्नांना परवानगी देण्यात येणार आहे. गटनिहाय ठरलेल्या शेवटच्या तारखेला दुपारी तीन वाजताच्या आतच प्रश्नपत्रिका काढता येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.दरम्यान कर्नाटक विधानसभेची बैठक ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. सुवर्ण विधानसौध बेळगाव येथे होणार आहे.