• रस्ता उखडल्याने वाहनधारकांसह स्थानिकांना होतोय त्रास 
  • लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी 

उचवडे दि. २७ ऑक्टोबर / महादेव खोत 

उचवडे गावचा मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडला आहे. रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने वाहनधारक, स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे; मात्र त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.गावात जाणारा मुख्य रस्ता हा अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात पडलेल्या  खड्ड्यातून  वाहन चालविणे अवघड झाले आहे. गावातील नागरिकांनी अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आराेप करण्यात आला. 

गाव परिसरात खडीमशीन उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असून, अवजड वाहनांचीही माेठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परिणामी, ग्रामस्थ, वाहनधारक, शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होतो.

महामार्गपासून गावं  २ किमी  अंतरावर असून १२०० इतकी गावची लोकसंख्या आहे. सदर रस्त्याचे काम हे १० ते ११ वर्षपूर्वी केले असुन त्यावर रस्त्याची डागडूजी पण  केली नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत अवजड वाहने जात असताना दुचाकीधारक व पायी चालत जाणाऱ्या लोकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. तेव्हा सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.