सांबरा / वाय.पाटील
सांबरा येथील कुस्ती कमिटीच्यावतीने आयोजित जोरबैठक मारण्याची स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ७२ विद्यार्थ्यानी सहभाग दर्शवत चांगला प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी सांबरा कुस्ती कमिटीच्यावतीने लहान आणि मोठा अशा दोन गटात बैठक (जोर बैठक) मारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लहान गटात : बसवंत कलखांबकर, सुयश हरजी, अनिकेत घोरपडे, स्वराज जत्राटी, विग्नेश हिरोजी, सुरज कानूचे हे अनुक्रमे पहिले सहा विजेते ठरले. तर मोठ्या गटात : यश सावगावकर, किशोर चौगुले, प्रतीक गंधवले, कार्तिक इरोजी, ओंकार पाटील, साई जाधव हे अनुक्रमे पहिले सहा विजेते ठरले. विजेत्यांना महादेव व्यायाम मंडळ येथे शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात रोख रक्कम आणि पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण सुळेभावी, यल्लाप्पा हरजी, नितीन चिंगळी, भुजंग धर्मोजी, शीतल तिप्पन्नाचे, भरमा चिंगळी, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, मोहन हरजी, शिवाजी मालाई, महेंद्र गोठे, शिवाजी जोगानी, अप्पानी यड्डी, लक्ष्मण जोई, मोहन जोई आदीनी परिश्रम घेतले.
0 Comments