मुंबई दि. १२ ऑक्टोबर २०२३
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या जात आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
बुधवारी सीमाप्रश्नी आयोजित केलेल्या तज्ञ समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीसह इतर विषयांबाबत माहिती जाणून घेतली.तसेच सीमाप्रश्न लवकरात लवकर निकालात निघावा यासाठी सर्व गोष्टींची पूर्तता केली जात असल्याचे सांगितले.
0 Comments