- आमदार विठ्ठल हलगेकर यांचे जि. पं. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल सोमान्ना हलगेकर व भाजपा नेते जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आज जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांची भेट घेऊन, पुढील वर्षी खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी पाच लक्ष्मी यात्रा होणार आहेत. त्यासाठी यात्रेच्या व्याप्तीत येणाऱ्या १०० खेड्यांतील मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली.
पुढीलवर्षी करंबळ गावची यात्रा असून ही यात्रा जळगे, रूमेवाडी, कौंदल, होनकल, या गावच्या ग्रामस्थांची यात्रा म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे मडवाळ - कापोली, तिओली, काटगाळी गावचीही यात्रा होणार आहे. यात मडवाळ - कापोली व तिओली यात्रेत अनुक्रमे २४ खेड्यांचा तर काटगाळी गावच्या यात्रेत नेरसा भागातील १६ खेड्यांचा समावेश आहे. तसेच बेकवाड गावची महालक्ष्मी यात्रा पुढील वर्षीच होणार आहे. पाच गावच्या होणाऱ्या या महालक्ष्मी यात्रेत, जवळजवळ १०० खेड्यांचा समावेश आहे. त्यासाठी पाणी, वीज, रस्ते, पाणंद व इतर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच वीज पुरवठा समस्येबद्दल हेस्कॉम चे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली .
तिओली, नेसरे, कक्केरी, माडीगुंजी, मडवळा आदी गावांमध्ये जत्रा भरत असल्याने खचलेल्या रस्त्यांसह गावांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अनुदान देण्याची मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगावचे जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आणि चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. त्यावर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
0 Comments