- चोरीच्या घटनानंतर व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पांगुळ गल्ली सह विविध ठिकाणी एका रात्रीत पाच दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. आज शनिवारी सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी धुडगूस घातल्याने पोलिसांसमोर चोऱ्यांचा तपास लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
पांगुळ गल्ली आणि मेणसे गल्ली येथील एकूण तीन दुकाने फोडली आहेत. त्याचबरोबर शनी मंदिर आणि अन्य एका ठिकाणी दोन दुकानात चोरीची घटना घडली आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे दुकानाचे मालक आले असता दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे आढळून आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना उघडकीस आल्या. तातडीने ही माहिती मार्केट पोलिसांना देण्यात आली. एका रात्रीत पाच दुकाने फोडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇
0 Comments