• शिवरायांच्या जयघोषाने सळसळले चैतन्य

बेळगाव / प्रतिनिधी 

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने  टिळकवाडी - अनगोळ परिसरात दुर्गामाता दौड काढण्यात आली. प्रारंभी टिळकवाडी श्री शिवाजी शिवाजी कॉलनी येथे विधीवत पूजन केल्यानंतर डॉ. दामोदर वागळे आणि टिळकवाडी पोलीस निरीक्षक  यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. यानंतर ध्येयमंत्र म्हणून दौडला सुरुवात झाली.

गेल्या दोन दिवसांप्रमाणे आज तिसऱ्या दिवशीही दौडला उदंड प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणी सुवासिनींनी पारंपारिक पद्धतीने औक्षण करून दौडचे स्वागत केले. अनेक ठिकाणी दौडवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दौडच्या मार्गावर महिलांनी सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. तर लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग साकारणारे देखावे सादर केले होते.

छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारी नवी पिढी आणि नवयुवक घडावे यासाठी दौडचे आयोजन केले जाते. हिंदू धर्म, हिंदू देवदेवतांचा जागर करण्यासाठी आणि जीवनाला योग्य दिशा दुर्गामाता दौडचा उपक्रम उपयुक्त ठरतो त्याला बेळगाव बेळगाव शहर आणि  तालुक्यातही उत्तम प्रतिसाद मिळत मिळत असल्याच्या प्रतिक्रिया दौडमध्ये सहभागी झालेल्या धारकर्‍यांनी व्यक्त केल्या.

टिळकवाडी शिवाजी कॉलनी येथून सुरू झालेली दौड एम. जी. रोड, महर्षी रोड, नेहरू रोड, टिळकवाडी पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ शुक्रवार पेठ, गोवावेस स्विमिंग पूल सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस खानापूर रोड अनगोळ क्रॉस,  अनगोळ रोड - हरी मंदिर,  चिदंबर नगर, पानसे हॉटेल रोड , विद्यानगर एस.व्ही. रोड यासह नियोजित मार्गांवर फिरून अनगोळ येथील महालक्ष्मी मंदिरात दौडची सांगता झाली.

पांढऱ्या शुभ्र कपडे, डोक्यावर भगवे फेटे आणि टोप्या, हाती भगवे ध्वज आणि तलवारी घेतलेल्या धारकऱ्यांसह शहर परिसरातील शेकडो युवक - युवती दौडमध्ये सहभागी झाले होते. एकंदरीत तिसऱ्या जल्लोषपूर्ण दौड पार पडली.