बेळगाव / प्रतिनिधी  

प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्व आहे. जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सुद्धा क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान आहे.असे मत जिल्हा शिक्षणाधिकारी एम. बी.नलतवाड यांनी व्यक्त केले.

तालुकास्तरीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते. आज मोबाईल व्हॉट्सअँप फेसबुक, ट्विटर, इंटरनेट या सुविधामुळे खेळ कुठेतरी मुलांच्या पासून दूर जातो  की काय अशी शंका निर्माण होत असताना विद्यार्थ्यांच्या खेळाविषयी आवड निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.

कर्नाटक सरकार बेळगाव जिल्हा पंचायत शिक्षण विभाग साक्षरता विभाग क्षेत्र गटशिक्षणाधिकारी कार्यालय शारीरिक शिक्षण शिक्षक संघ  यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा जळगाव शहर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे नुकताच जळगाव जिल्हा क्रीडा संकुलन नेहरू स्टेडियम येथे  KLE  हॉस्पिटल जवळ असलेल्या भव्य क्रीडांगणावर या स्पर्धांचा प्रारंभ करण्यात आला. व्यासपीठावर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटक म्हणून  बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेट यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी व्यासपीठावर शाळा शिक्षण अक्षरदासोग विभागाचे अधिकारी बसवराज मिलानट्टी, प्रा. निलेश शिंदे, बेळगाव जिल्हा प्राथमिक शारीरिक शिक्षण संघाचे अध्यक्ष रमेश डीग्रज, समन्वय अधिकारी आय.डी. हिरेमठ,  बेळगाव जिल्हा माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, बेळगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटना महिला अध्यकक्षा श्रीमती जी. पी पटेल,  बेळगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष हणमंत मस्तीहोळी, तालुका प्रधान कार्यदर्शी बी.जी. हिरेमठ उपस्थित होते.  मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे ध्वजारोहण करून झाल्यानंतर क्रीडा ज्योत देऊन पथ संचलनाला चालना दिली.