- दोन्ही गटातील ६० जणांवर गुन्हे दाखल
खानापूर / प्रतिनिधी
तोपिनकट्टी (ता.खानापूर) येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद होऊन झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण ६० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय ८ जणावर जातिवाचक (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुनील गुरव व बबलू गुरव अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
या घटनेबाबत सविस्तर हकिकत अशी की, तोपिनकट्टी गावात दोन दिवसांपूर्वी, दोन युवकात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन मोठया भांडणात झाल्याने शुक्रवारी सकाळी दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे गावात वातावरण तंग बनले होते. सकाळपासूनच गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खानापूरचे सीपीआय मंजुनाथ नाईक व बैलहोंगल चे डीएसपी रवी नाईक यांनी सकाळी गावात भेट देऊन दोन्ही गटात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सुद्धा दोन्ही गटातील लोकांना शांतता पाळण्याचे आवाहन केले. तरीसुद्धा गावात वातावरण तंग होते. अखेर पोलिसांनी आज संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला.
0 Comments