बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला होता. यामध्ये बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुखपदी आयपीएस भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या आदेशानुसार नूतन जिल्हा पोलीसप्रमुख आयपीएस भीमाशंकर गुळेद यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी पदभार सोपवून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नूतन पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद म्हणाले, आज मी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. बेळगाव जिल्ह्यातील गुंडगिरी, अवैध कारवाया मोडून काढून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.एसपी डॉ. संजीव पाटील यांनी खूप चांगले काम केले असून त्यांचे काम मी यापुढेही सुरु ठेवणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
0 Comments