बेळगाव / प्रतिनिधी
२०१४ सालच्या निवडणुकीत आश्वासनांची खैरात करून केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले आहे. तेव्हा आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करण्याऱ्या केंद्र सरकारचा आज कम्युनिस्ट पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बेळगावात तीव्र निषेध केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देत, निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना कम्युनिस्ट पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी, केंद्र सरकार गेल्या ९ वर्षांपासून जनतेची फसवणूक करत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून अनेक वर्षे जीवनावश्यक तसेच इतर वस्तूंचे वाढलेले दर कमी करावेत, अन्नभाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ०५ किलो तांदूळ द्यावा, बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्यात, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवावे. अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments