बेळगाव / प्रतिनिधी 

आनंदवाडी भागातील ज्येष्ठ पंच स्वर्गीय निंगाप्पा भेकणे यांचे चिरंजीव बाबासाहेब भेकणे यांनी नुकत्याच पार पडलेल्या मार्कंडेय शुगर फॅक्टरीच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजय मिळविला. 

या विजयाबद्दल आनंदवाडीवासियांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंकरगौडा पाटील, विनायक पाटील, शशिकांत रणदिवे यांच्याहस्ते शाल श्रीफळ देऊन बाबासाहेब भेकणे यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी शेतकरी बचाव पॅनल मधून निवडणूक लढविली होती. 

याप्रसंगी समाजसेविका माधुरी जाधव यांनी भेकणे कुटुंबियांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांच्या पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या. बाबासाहेब भेकणे हे प्रतिष्ठित कारखानदार म्हणून ओळखले जातात. याचबरोबर वेदांत सोसायटीच्या संचालकपदी ते कार्यरत आहेत. सत्कारप्रसंगी गल्लीतील पंचमंडळी, महिला मंडळ, गणेश मंडळ व नागरिक उपस्थित होते.