- बेळगाव आझमनगर येथील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
शॉर्टसर्किटमुळे तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी आझमनगर बेळगाव येथे एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. मृतांमध्ये आजोबा - आजीसह नातीचा समावेश आहे. इराप्पा गणगप्पा लमाणी (वय ५०), पत्नी शांता (वय ४५) आणि नात अन्नपूर्णा मुन्नाप्पा लमाणी (वय ७, सर्वजण रा. रामदुर्ग तालुका अरबेंचीतांडा) अशी मृतांची नावे असून ते लमाणी समाजातील एकच कुटुंबातील आहेत.
पाणी गरम करण्याची कॉईल काढतेवेळी शॉक लागल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून ही घटना नेमकी कशी घडली याची चौकशी एपीएमसी पोलीस करत आहेत. त्यानंतर या घटनेचे नेमके कारण समोर येणार आहे.
दरम्यान घटनेचा पंचनामा करून एपीएमसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेची नोंद एपीएमसी पोलीस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments