• दगडाने ठेचून करण्यात आली हत्या 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील शिवबसवनगर येथील स्पंदन हॉस्पिटलजवळ बुधवारी रात्री एका युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली. नागराज इराप्प्पा गाडीवड्डर (वय ३० रा.वड्डरवाडी) असे मृताचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार युवकाचा हल्लेखोरांनी पाठलाग केला आणि दगडाने ठेचून त्याचा खून करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी धाव घेतली. त्या परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.