• सलग दुसऱ्यादिवशीही बंदी असलेले २१५ किलो प्लास्टिक जप्त 
  • व्यापाऱ्यांकडून वसूल केला दंड 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव महापालिकेने बंदी असलेल्या प्लास्टिक विरोधी  धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आज सलग दुसऱ्या दिवशी मनपा अधिकार्‍यांनी शहरातील विविध ठिकाणी विक्रेते आणि  दुकानांवर छापा टाकला असता सुमारे २१५ किलो साठा सापडला.यावेळी बंदी असलेले प्लास्टिक जप्त करून दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान काल मंगळवारीही मनपाच्या वतीने विविध ठिकाणी धडक मोहिमेंतर्गत ५५० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले होते.

महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या निर्देशानुसार शहरात  तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी २१५ कि.ग्रॅ. प्लास्टिक जप्त करून ४४,७०० रुपयांचा दंड वसूल केला.या संदर्भात बोलताना आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम - २०१६ आणि दुरुस्ती नियम - २०२२ नुसार पावले उचलण्यात आली आहेत. सहाय्य्क पर्यावरण अभियंता  नेतृत्वाखालील आरोग्य निरीक्षक आणि पर्यावरण अभियंता या कारवाईत सहभागी झाले होते.