- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे आदेश
बेळगाव / प्रतिनिधी
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खानापुर, कित्तूर, बेळगाव तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांना उद्या सोमवार (24 जून) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. या भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
0 Comments