- मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कामाला प्रारंभ
सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) (ता.बेळगाव) येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान असलेल्या ब्रम्हलिंग मंदिर परिसराच्या सुशोभिकरण कामाचा रविवार दि. ३० जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात पूजन करून उपक्रमाला चालना देण्यात आली.
तत्पूर्वी मंदिर सुशोभिकरणाच्या शुभारंभानिमित्त ब्रह्मलिंग मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. देवस्की पंच कमिटी, सुळगा (हिं.) चे अध्यक्ष लक्ष्मण गुंडू पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी परशराम फकिरा पाटील, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ सुळगा (हिं.) यांच्याहस्ते गणेश प्रतिमा पूजन, यल्लाप्पा कल्लाप्पा पाटील, सदस्य देवस्की पंच कमिटी सुळगा, (हिं.) यांच्याहस्ते श्री लक्ष्मी प्रतिमा पूजन, बाळू मोनाप्पा पाटील प्रगतशील शेतकरी यांच्याहस्ते छ. शिवाजी महाराज प्रतिमा पूजन, न्यूज २४ तास मराठी डिजिटल मीडिया संपादक, रोहन बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते बसवाण्णा मूर्ती पूजन, युवा कार्यकर्ते बाळू बाबुराव पाटील यांच्याहस्ते कासव पूजन करण्यात आले. तर युवा कार्यकर्ते अजित मल्लाप्पा कलखांबकर यांनी श्रीफळ वाढविले. यानंतर मान्यवरांसह सर्वांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविकात शेखर मनोहर पाटील यांनी मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी पप्पू भ. पाटील, अजित मल्लाप्पा कलखांबकर, लक्ष्मण गुंडू पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना आजचा दिवस गावासाठी मंगलमय दिवस असल्याच्या भावना व्यक्त करत, सुशोभिकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या गावातील युवकांचे कौतुक करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील इच्छुक तरुण आणि ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेऊन यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते पेव्हर्सचे पूजन करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शेखर पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी देवस्की पंच कमिटी सुळगा, (हिं.) ग्रामविकास मंडळ सुळगा, (हिं.) चे पदाधिकारी-सदस्य, गावातील प्रगतशील शेतकरी,ज्येष्ठ नागरिक आणि युवक उपस्थित होते.
0 Comments