•  नदीतील पंपसेट काढण्यासाठी गेला असता दुर्घटना 

चिक्कोडी / वार्ताहर 

दूधगंगा नदीतून मोटार पंपसेट काढण्याच्या प्रयत्नात विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावानजीक ही दुर्घटना घडली. अण्णाप्पा नायडू खोत  (वय ४२ रा.वडागोळ) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, मलिकवाड गावानजीक दूधगंगा नदी प्रवाहित झाल्याने अण्णाप्पा खोत हे एका सहकाऱ्यासह मोटार पंपसेट काढण्यासाठी गेले होते. यावेळी मोटार पंपसेट काढण्याच्या प्रयत्नात विद्युतभारित तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणाची नोंद सदलगा पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.