- बळीराजाला दिलासा : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
सुळगा (हिं.) / वार्ताहर
बेळगावच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीचे पाणी अखेर पात्राबाहेर पडले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याने या भागातील जनतेचा यंदाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे.उचगावच्या गणेश मंदिरानजीक गणेश मार्कंडेय तीर्थक्षेत्रावरून या मार्कंडेय नदीच्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिक घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राकसकोप ते कल्लेहोळ पर्यंतचा संपूर्ण भाग पाणलोट क्षेत्र असल्याने भरपूर पाण्याचा साठा मार्कंडेय नदीपात्रात जमा होतो. परिणामी मार्कंडेय नदीमध्ये पाण्याचा साठा होतो. सध्या मार्कंडेय नदीची पाणीपातळी वाढल्याने पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, नदीच्या दुतर्फा असलेल्या शेतवाडीत पाणी पसरले आहे. शेतवाडीत पाणीच पाणी झाल्याने सध्या सर्व शेतकरी चिखल व भातरोप लागवडीमध्ये व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे.
0 Comments