- आंबोली,वैजनाथ परिसरात सीडबॉलच्या माध्यमातून बियांची पेरणी
बेळगाव / प्रतिनिधी
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संगोपन करणे, वृक्षारोपण आणि जंगलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. याच उद्देशातून जायंट्स नर्सरीची स्थापना करण्यात आली आली असून या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.यावर्षी काजू, फणस, आंबा, जांभूळ अशा विविध फळबियांचे सीड बॉल बनवून ते जंगलात पेरण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेने आज आंबोली आणि चंदगड तालुक्यातील वैजनाथ देवस्थानच्या परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये एक हजाराहून अधिक सीडबॉलच्या माध्यमातून बियांची पेरणी केली.
आत्तापर्यंत प्रशासनामार्फत खड्डे बनवून त्यात बिया पेरून किंवा रोपटे लावून वृक्षारोपण केले जात होते. मात्र बियांचा बॉलच तयार केला तर वृक्ष लागवडीचा मोठ्या प्रमाणात येणारा खर्च वाचतो, त्यामुळेच जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील मुतगेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या फेरीत सहभागी सदस्यांनी जायंट्सचा निर्धार निसर्ग करूया हिरवागार, 'झाडे लावा, झाडे जगवा 'अशा जोरदार घोषणा दिल्या.
या उपक्रमात अध्यक्ष मुतगेकर यांच्यासह माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, मदन बामणे, शिवराज पाटील, अशोक हलगेकर, उमेश पाटील, सचिव - लक्ष्मण शिंदे, खजिनदार - विजय बनसूर, उपाध्यक्ष अविनाश पाटील,अरुण काळे राजू जैन, आनंद कुलकर्णी, मंजुनाथ शिरोडकर, जयवंत पाटील, विश्वास पवार, मोहन पत्तार, गावडू पाटील पद्मप्रसाद हुल्ली, सुनील पवार सुनील चौगुले, राहुल बेलवलकर, मधु बेळगावकर, बाळकृष्ण तेरसे, भास्कर कदम, पुंडलिक पावशे, प्रदीप चव्हाण महादेव भस्मे,भाऊ बंडाचे, सुभाष नांदवडेकर, मुकुंद महागावकर यांनी सहभाग घेतला होता.
0 Comments