• उद्या रविवार दि. ३० जुलै रोजी सुशोभिकरण कामाचा शुभारंभ
  • देवस्की पंच कमिटीच्या संमतीने गावातील युवक राबविणार उपक्रम 
  • मंदिर परिसरात पेव्हर्स बसवून करणार वृक्षारोपण 

सुळगा (हिं.) / वार्ताहर

सुळगा (हिं.) (ता. बेळगाव) येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान असलेल्या ब्रह्मलिंग मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रविवार दि. ३० जुलै रोजी सकाळी ९ वा. देवस्की पंच कमिटी आणि गावातील युवकांच्या उपस्थितीत सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ होणार असून पूजन करून कामाला चालना देण्यात येणार आहे.

देवस्की पंच कमिटीच्या संमतीने गावातील युवकांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमांतर्गत  ब्रह्मलिंग मंदिर सभोवतालच्या परिसरात पेव्हर्स बसविण्यासह वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

तरी शुभारंभप्रसंगी गावातील सर्व युवक मंडळे, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.