खानापूर / प्रतिनिधी 

"चांद्रयान - ३" मोहिमेत सहभाग घेतलेल्या अनगडी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील युवा वैज्ञानिक  प्रकाश पेडणेकर यांच्या कुटुंबियांची आज आ. विठ्ठल हलगेकर  यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकाश पेडणेकर यांचे वडील नारायण आणि आई सुनिता यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तालुक्याच्या वतीने सत्कार केला.

तत्पूर्वी बोलताना आ. विठ्ठल हलगेकर म्हणाले, संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर इस्रो सारख्या संस्थेत काम करताना युवा वैज्ञानिक प्रकाश पेडणेकर यांनी देशासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असून खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच पुत्राच्या जडणघडणीत पालकांचा वाटाही मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवाजी पाटील, लक्ष्मण गुंडप, संजीव वाटुपकर, प्रल्हाद पाटील, गेणाप्पा वाटुपकर, दत्ताराम सुतार, आप्पान्ना बोरगावकर, वामन पाटील,मधुकर सुतार, पांडुरंग मिराशी, विश्वनाथ मिराशी, योगेश सुतार, राजू लक्केबैलकर, रविचंद्र पाटील आदि उपस्थित होते.